आमची प्रेरणादायक कथा

१९७७ मध्ये आदेश बोरावके, अर्थात निवृत्ती सदाशिव बोरावके यांनी पुण्यात आपल्या प्रवासाची सुरुवात केली. वर संशोधनाच्या क्षेत्रात काम करताना, त्यांच्या मनात एक विचार आला: "जर उच्चवर्गीयांसाठी विवाहसंशोधन सोपे नाही, तर माळी समाजासाठी किती कठीण असेल?"

याच विचाराने प्रेरित होऊन, माळी समाजातील कष्टकरी वर्गासाठी आदर्श विवाहसंशोधन संस्थेची स्थापना झाली.

आमची कर्तृत्व गाथा:

  • ५,०००+ यशस्वी विवाह जुळवले आणि अनेक कुटुंबांना आनंद दिला.
  • माळी समाजात "विवाह सूचक" ही संकल्पना प्रतिष्ठित केली.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपरिक जोडीदार शोधण्याची प्रक्रिया सुलभ केली.

आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद!

आमच्या प्रवासात साथ दिल्याबद्दल आणि आपला विश्वास कायम ठेवल्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही सतत प्रगती करत आहोत.